बांदा (उत्तरप्रदेश) : समाजातील विघातक प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस असतात, परंतु काही पोलिसांच्या वर्तवणूकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत असते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी हात जोडून उभ्या असलेल्या एका वृद्धाला लाथ मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ माजी आयपीएस अधिकाऱ्यानेही ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती पोलिसांसमोर हात जोडून बोलताना दिसत आहे. मात्र बोलत असलेल्या वृध्द व्यक्तीला पोलीस कर्मचारी लाथ मारतो. त्यानंतर त्यांना दोनदा लाथ मारुन ‘भाग भाग’ म्हणतो. आजूबाजूला लोकांची गर्दीही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Some police reforms do not require funds. Just proper training and strict disciplinary action. https://t.co/DYDNCgh0LE
— RK Vij (@ipsvijrk) January 31, 2022
पोलिसांने पीडित व्यक्तीचे वर्णन ‘विकृत व्यक्ती’ असे केले आहे. ‘हा म्हातारा “विकृत” असल्याचे म्हणत पोलिसाने म्हटले. शिवाय, २९ जानेवारीच्या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे युपी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचवेळी माजी आयपीएस अधिकारी आर.के. विज यांनी व्हिडिओ शेअर करताना या पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.







