मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दिवंगत अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ चित्रपटात काम केलेले अभिनेते-चित्रपट निर्माते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेत्याची पत्नी आणि चित्रपट निर्मात्या मृणालिनी पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ यांनी रंगदारी (२०१२) आणि धूम (२०१३) या चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, गेले काही दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४.३० वाजता त्यांचे निधन झाले.
अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कागर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम (२००१३), रंगदारी (२०१२), ये दिल्लगी (२०१३) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. २००० मध्ये अभिनेत्याने मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. त्यांना शिवम आणि अमृता हे दोन मुलं आहेत. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.







