जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील सराफ बाजार ते सुभाष चौकात महिलेच्या पर्समधून ३८ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, वंदना सुभाष ठाकूर, ( वय-४५ ) रा. साई पॅलेस हॉटेल मागे वैष्णवी पार्क, जळगाव बुधवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्या कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील सराफ बाजारात आल्या होत्या. काय वस्तू खरेदी केल्यानंतर सराफ बाजारकडून सुभाष चौकाकडे येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दोन हजार रुपयांची रोकड असा ३८ हजार २०० रु/ किंमतीच्या ऐवज चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
या प्रकरणी महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन भाग्यात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे करीत आहे.







