जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : येणारी लग्नसराई लक्षात घेता प्रामाणिकता, शुध्दता, सचोटी व नावीन्यपूर्ण डिझाईन्स या चतुसूत्रीवर व्यवहार करणाऱ्या भंगाळे गोल्डने जळगावात अल्पावधीतच लग्नाचे दागिने म्हणजे भंगाळे गोल्ड अशी ओळख निर्माण केली आहे. तसेच ग्राहकांना दागिने खरेदीवर केवळ ११ टक्के मजुरी लावण्यात येणार आहे.
लग्नाच्या सर्व विधींकरिता पारंपारिक तसेच आधुनिकतेची जोड देत नावीन्यपूर्ण अशा दागिन्यांची संपूर्ण रेंजच भंगाळे गोल्डमध्ये उपलब्ध आहे. पारंपारिक दागिन्यात मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार, इयररिंग, झुमके, बांगड्या, पाटल्या, तोडे, मोठं कडं, बुगडी, वेल, वाकी या सोन्याच्या दागिन्यांना कमी-अधिक प्रमाणात मागणी आहे. तसेच खास डिझाइन्समध्ये उपलब्ध असलेल्या पेशवाई, टेम्पल, ॲन्टीक ज्वेलरीला केवळ १३ टक्के मजुरी लावण्यात येणार आहे.
विविध आकर्षक डिझाईन्समध्ये हार या पारंपरिक दागिन्यांमध्ये चिंचपेटी, ठुशी, तन्मणी, कोल्हापुरी साज, चपलाहार, लक्ष्मीहार आणि शाहीहार असे प्रकार उपलब्ध असून, बोरमाळ, मोहनमाळ या माळ प्रकारांमध्ये नावीन्यपूर्ण डिझाइनचा बदल करुन परंपरला आधुनिकतेचा साज चढविण्यात आला आहे.
तसेच ग्राहकांच्या भविष्यातदेखील सोने खरेदी सुलभ व्हावी याकरिता सुवर्णगंगा व सुवर्णधारा या योजनाही सुरु करण्यात आल्याआहेत. तसेच ग्राहकांना फायदा देणारी सोने बुकिंग योजनाही सुरु असून, यात सोने दराच्या चढउतारामध्येही बुकिंग केलेल्या दरात किंवा दर कमी झाल्यास कमी दरात सोनेखरेदीची सुविधा आहे. म्हणजेच सोन्याचा भाव जरी वाढला तरी फायदा आणि कमी झाला तरी ग्राहकांचाच फायदा होणार आहे. तसेच ग्राहक खरेदी करत असलेल्या सोन्याची शुध्दता त्याला तपासता यावी म्हणून कॅरेटोमीटरने सोने शुध्दतेची तपासणीही उपलब्ध आहे.
कुठल्याही दुकानातील दागिन्याच्या मोडवर सर्वात जास्त भाव भंगाळे गोल्डमध्येच देण्यात येतो. म्हणूनच परंपरेसोबतच आधुनिकता जपणाऱ्या नावीन्यपूर्ण दागिने खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘भंगाळे गोल्ड’मधील नावीन्यपूर्ण डिझाइनच्या दागिन्यांचा खरेदीचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन भंगाळे गोल्डतर्फे संचालक भागवत भंगाळे, आकाश भंगाळे व सागर भंगाळे यांनी केले आहे.







