महिला पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तवणूक करणाऱ्या पत्रकारास दिला नागरिकांनी चोप

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील नेरीनका चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यासोबत एकाने हुज्जत घालत गैरवर्तन केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यास नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी गुरुवारी दुपारपासून नेरी नाका चौक येथे कर्तव्य बजावत होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सलीम खान अरमान खान पठाण (रा.पाळधी) हा त्याठिकाणी आला व या कर्मचाऱ्याला मनीषा मॅडम यांचा नंबर मागितला मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नंबर देण्यास नकार दिला असता तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. अखेर वैतागून या महिला कर्मचाऱ्याने तिच्या काही सहकाऱ्यांना याबाबत कळविले.

सलीम खान याने महिलेचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मी रिपोर्टर असून तुझी नोकरी घालवतो. तुझा साहेब पण मला सलाम करेल. असे तो सांगू लागला. महिला कर्मचारीने मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेचा हात ओढला. परिसरात असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी त्या पत्रकाराला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक यशोदा कानसे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here