चाॅकलेट खायला देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती झाल्यावर प्रकार उघडकीस

पुणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर सूर्यकांत चव्हाण) : तरुणाने अल्पवयीन मुलीला चाॅकलेट खायला दिले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुळशी तालुक्यातील माण येथे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी व त्यानंतर वेळावेळी हा प्रकार घडला.

ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू (वय १९, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. उडीसा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित १६ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २८) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी चाॅकलेट घेऊन आला. त्यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आईवडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चाॅकलेट खाण्यास दिले. चाॅकलेट खाल्ल्यावर पीडित मुलगी ही झोपी गेल्यावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. ही बाब तिच्या घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here