एमआयडीसी पोलीसांनी केली सराईत चोरट्याला अटक

midc-jalgaon-police-arrest-thief

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील मासुमवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजीव ग्यानप्रसाद सागर (वय-३३, रा. महालक्ष्मी दालमिल एमआयडीसी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या कंवरनगर पोलीस चौकीच्या हद्दीत पोलीस कर्मचारी पोहेकॉ अतुल वंजारी, योगेश सपकाळे, सुनिल सोनार, किरण पाटील, सचिन पाटील, राजश्री बाविस्कर हे सोमवारी २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास कॉम्बिंग ऑपरेशन राबवित होते.

यावेळी आठवडे बाजारात संजीव सागर हा आपली ओळख लपवून फिरत होता. यावेळी पोलिसांनी त्याला आवाज दिला असता तो अंधराच्या दिशेने पळून जात होता. दरम्यान, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्यााला पकडले असता, तो रेकॉर्डवरील सराईत चोरटा असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here