चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडाळा-वडाळी गावाकडून अवैधरित्या वृक्षतोड करुन, त्याची चोरटी वाहतुक करताना, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर पकडले आहे. ही कारवाई दि,८ रोजी करण्यात आली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस पुढील कारवाईसाठी वनविभागाला पत्र पाठवले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, पोना गोवर्धन बोरसे, पोना शांताराम पवार, पोना संदिप पाटील आदिचे पथक तालुक्यातील वाघळी शिवारात पेट्रोलिंग करत असतांना, पो.नि.संजय ठेंगे याना गुप्त माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने त्यांनी वाडाळा-वडाळी गावाकडून वाघळी गावाकडे अवैध लाकूड तोंड करुन, त्याची चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर ( क्र. एमएमच,१९,बीजी-५३७२) वाघळी चौफुलीवर थांबविले. ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात अवैध तोडलेले निंबाचे लाकूड आढळून आले. ट्रॅक्टर चालकाची विचारपूस केली त्याने त्याचे नाव अल्ताफ अली नवाब (रा.वाघळी) असे सांगीतले. तसेच टॅ्रक्टर हे गुलाब बंडू शिरसाठ रा.वाघळी यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.
लाकूडतोडीचा व वाहतुकीचा परवाना नसल्याचे देखील सांगीतले. पोलिसांनी ट्रॅक्टर चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमा करुन, पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र आधिकारी यांना पत्र दिले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसपासून चाळीसगाव परिसरात अवैधरित्या वृक्षतोड होत आहे परंतु वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.







