पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचे सांगितले आहे.
पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे यासंदर्भात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती २१ एप्रिल २०२२ रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे.







