उरळ(जिल्हा अकोला विदर्भ) (ॲड. चंद्रकांत कराळे) – दैनिक बातमीदार या वर्तमानपत्राचे विदर्भ विशेष प्रतिनिधी सतिष रमेशचंद्र अग्रवाल, शेगांव यांना ५ ऑगस्ट रोजी लोहरा,ता.बाळापूर येथील सुशील उर्फ बबलु सिंघल (ठाकुर) व निलेश सिंघल (ठाकुर) व इतर १५ ते २० अनोळखी व्यक्तींनी “आमच्या विरुध्द बातम्या का छापतोस’ असे म्हणून बेदम मारहाण केली तसेच अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज व नगदी रोख रक्कम काढुन घेतले.या गुंडांनी केलेल्या हल्ल्याची ही घटना निंदनीय असून सदर घटनेचा शेगाव तालुका पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.
याप्रकरणी आपणाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गतच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला नाही. तरी सदर घटना ही पत्रकारितेशी संबंधीत असल्याने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गतच्या कलमांचा समावेश करण्यात यावा तसेच आरोपीना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन गृहमंत्री ना.अनिल देशमुक, अकोल्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू, बाळापूरचे आ.नितीनभाऊ देशमुख, जिल्हाधिकार, अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक, अकोला उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापूर, तहसीलदार,बाळापूर, अध्यक्ष, जिल्हा पत्रकार संघ, बुलडाणा, अध्यक्ष, जिल्हा पत्रकार संघ, अकोला यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर अनिल उंबरकार, जिल्हा सरचिटणीस, संजय सोनोने, मा. जिल्हा कोषाध्यक्ष, राजेश चौधरी, तालुकाध्यक्ष, शेगांव, श्री.कुलकर्णी कार्याध्यक्ष, देवानंद उमाळे सरचिटणीस, फहीम देशमुख, अविनाश दळवी, धनराज ससाणे, अमर बोरसे, विजय मिश्रा, दिनेश महाजन, नानाराव पाटील, श्याम देशमुख, देविदास कळसकर, सतीश अग्रवाल, संजय त्रिवेदी, संजय ठाकूर त्रिवेदी, संतोष पिंगळे, मंगेश ढोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







