जळगाव शहरात सर्वाधिक १४१ कोरोनाबाधित तर ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, प्रशासनाच्यादृष्टीने ही चिंतेची बाब होऊ लागली आहे. आज (दि.१२) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सलग तिसर्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळुन तब्बल ५७१ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित जळगाव शहरात १४१ आढळले आहेत. त्यातून कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ हजार ९६२ झाली आहे. दिवसभरात ८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये मध्ये जळगाव शहर १४१, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ २८, अमळनेर १७, चोपडा ५६, पाचोरा १४, भडगाव ९, धरणगाव ४०, यावल १७, एरंडोल १७, जामनेर ३०, रावेर १६, पारोळा ३०, चाळीसगाव ७८, मुक्ताईनगर २१, इतर जिल्ह्यातील १० असा समावेश आहे. दिवसभरात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात भुसावळ तालुक्यात २, चोपडा, पाचोरा, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.







