मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – जगभरासहित संपूर्ण भारत देश हा किरोना विषाणूच्या महामारीमुळे लॉकडाऊन व त्यानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा सामना करीत असताना तालुक्यातील उपरोक्त संघटनेने मात्र आपल्या सार्वजनिक उपक्रमा अंतर्गत “एकच लक्ष आपली वाडी परिसर स्वच्छ व पर्यायाने आपला गाव स्वच्छ” या उक्तीला अनुसरून आगामी काळात सामाजिक कार्याची कास धरून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सलग दुसऱ्या वर्षी गौरी – गणपतीच्या सणा निमित्ताने आपली वाडी व तिच्या आजूबाजूच्या परिसरात स्वछता अभियान उपक्रम राबविले. त्यामध्ये वाडीच्या पिण्याच्या पाण्याची विहीर तसेच टाकी व तिच्या आजू बाजूचा व घरांच्या लगत असलेला अस्वच्छ परिसर स्वच्छ केला. तसेच गणपती आगमन व विसर्जन करण्यासाठी तसेच दैनंदिन वापर करीत असलेली कच्या स्वरूपाची पायवाट व सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्याचे पायऱ्या स्वरूपात बांधणी करून तात्पुरती डागडुजी केली. हा उपक्रम शिवसाई मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील, कार्याध्यक्ष शरद पाटील, सचिव जिगर पाटील, सहसचिव सचिन पाटील, सल्लागार बाबू पाटील, भिकू पाटील, तुकाराम पाटील, श्रीपत पाटील यांच्या कुशल नियोजन व मार्गदर्शना खाली नियोजित करण्यात आला होता. तसेच उपक्रमास मंडळाचे सभासद संतोष पाटील, संदेश पाटील, कल्पेश पाटील, सदस्य कु. शुभम पाटील, कु. दिपेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी शिवसाई महिला मंडळ – दाभीळतील (पाटीलवाडी) सभासद व सदस्य गंगाबाई पाटील, सौ. देवकी पाटील, सौ. मनीषा पाटील, सौ. वंदना पाटील, सौ. चंद्रभागा पाटील, सौ. सरिता पाटील, सौ. साक्षी पाटील, सानिका पाटील, सौ.आश्वी पाटील, सौ.सायली पाटील, सौ. वासंती पाटील, कु. समीक्षा पाटील, कु. दीपिका पाटील, कु. रुपाली पाटील आदी महिला वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रम मंडळाचे मार्गदर्शक सल्लागार शांताराम पाटील यांच्या निरीक्षणाखाली यशस्वीपणे संपन्न झाला.









