धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – तालुक्यातील भोणे येथील मुळ रहिवासी योगेश रतिलाल वाघ (पाटील) यांनी जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासोबत अमळनेर तालुका प्रमुख विजय पाटील,धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील , उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, वाहतुक सेनेचे शेखर पाटील, विलास पवार आदी उपस्थित होते, पुढील पक्षाच्या काम करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.







