नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : नेरूळ परिसरातील सेक्टर १७ मधील जिमी पार्क नावाच्या इमारतीचा संपूर्ण भाग कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. इमारतीत १२ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. या इमारतीत ड्रिलिंगचं काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
Maharashtra | A part of building collapses in Navi Mumbai; rescue operation underway pic.twitter.com/zC0S05B8Oz
— ANI (@ANI) June 11, 2022
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं की, या इमारतीचा वरचा भाग कोसळला. एकूण ७ जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. नेरुळ, कोपरखैरणे आणि वाशी अग्नीशमन केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.







