जळगाव (प्रतिनिधी अहमद रजा) : शहरातील आंबेडकर नगरात गावठी पिस्तूल व काडतुसासह संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील आंबेडकर नगरात सागर सुरेश सपकाळे (वय-२८) रा. कोळीपेठ जळगाव हा बेकायदेशीर हातात गावठी पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी सागर सुरेश सपकाळे यांला शनीपेठेतील आंबेकडकर नगरातून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि किरणकुमार बकाले, यांच्या पथकातील हे कॉ विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, पोलीस नाईक विजय पाटील, प्रीतम पाटील, पो.कॉ सचिन महाजन, पंकज शिंदे, आदींनी सहभाग घेतला. अटकेतील सागर सपकाळे यास पुढील कारवाई कामी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव जळगाव पोलिसांनी गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणास शनिपेठ भागातून केले जेरबंद







