यावल येथील पेठेच्या श्रीराम ( शनि मंदिरात ) मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

यावल (सुरेश पाटील) – येथील सातोद रोड वरील श्रीशनी मंदिर तथा पेठेच्या श्रीराम मंदिरात काल दिनांक 11 मंगळवार रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण जन्माष्टमी भाविकांच्या नागरिकांच्या अनुपस्थितीत फक्त संबंधित पुजारी तथा ब्राह्मण आणि मंदिराचे संचालक सुनील जोशी यांनी साजरी केली.
कोरोना विषाणू परिस्थिती लक्षात घेता भाविकांना आणि कोणत्याही नागरिकांना आमंत्रित न करता किंवा मंदिरात येऊ न देता काल दिनांक 11 मंगळवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
दरवर्षाप्रमाणे मोठा उत्सव साजरा न करता यावर्षी कोरोना वायरस प्रादुर्भाव असल्यामुळे मंदिराचे संचालक तथा पुजारी सुनील देवधर जोशी यांनी एकदम साध्या पद्धतीने नागरिक भाविकांची गर्दी न करता रात्री 12 वाजता काकड आरती करुन श्रीकृष्ण जयंती शास्त्रोक्त पद्धतीने साजरी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here