न्यायालयाने आरजेडीचे दिग्गज नेते आणि आमदार अनंत सिंह यांना ठोठावली १० वर्षांची कोठडी

bahubali-rjd-mla-anant-singh

मोकामा (बिहार) : येथील आरजेडीचे दिग्गज नेते आणि आमदार अनंत सिंह यांना लडमा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात एके-४७ रायफल आणि ग्रेनेड सापडल्याप्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

अनंत सिंह यांच्या घरातून एके-४७ आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. अनंत सिंह यांना मंगळवारी (दि. २१) पाटणा येथे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. पोलिसांच्या दाव्यावर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अनंत सिंह यांना दोषी ठरवण्यात आलं आणि आता या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने निर्णय दिला आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह सध्या पाटणा येथील बेऊर कारागृहात आहेत.

अनंत सिंह हे या पूर्वी नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षात होते. अनंत सिंह यांनी २०२० मध्ये आरजेडीच्या तिकिटावर विधानसभा निवडणक लढवली होती आणि या निवडणुकीत ते विजयी झाले होते. परंतु, सध्या शस्त्रसाठा प्रकरणात ते कारागृहात आहेत. बिहारचे बाहुबली समजले जाणारे आमदार अनंत सिंह यांच्याविरुद्ध सुरू असलेला हा खटला बिहार सरकारने विशेष प्रकरणांच्या श्रेणीत ठेवला होता. आरोपीविरुद्ध या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात आले होते. या खटल्याची जलद सुनावणी करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नियुक्त विशेष सरकारी वकिलांनी १३ पोलिसांना न्यायालयात हजर केलं होतं. तर दुसरीकडे बचाव पक्षातर्फे अनंत सिंह यांच्या वतीने ३३ साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली, त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here