तरुणीने केला तरुणीवर बलात्कार; मोबाईलवर बनवला व्हिडिओ

mobile-video
संग्रहित छायाचित्र

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : एका तरुणीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणीने बलात्कार करतानाचा व्हिडिओ देखील बनवला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

पीडित आणि आरोपी तरुणीची फेसबुकद्वारे एकमेकींशी ओळख झाली होती. आरोपी तरुणीने पीडित तरुणीला चित्रपटात काम करून देण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत ग्वाल्हेरला नेले. यानंतर दहा दिवस तिला एका ठिकाणी कैद करुन ठेवले. या दरम्यान आरोपी तरुणीनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तसेच या गैर कृत्याचे तिने व्हिडिओ देखील बनवला.

पीडित तरुणी ही गोरखपूर जिल्ह्यात राहणारी आहे. तरुण आरोपी तरुणी ग्वाल्हेरमध्येच राहते. या दोघींची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. यानंतर त्यांच्याच फेसबुकवर चॅटिंग सुरु झाले. यानंतर आरोपी तरुणीने या मुलीचा फोन नंबर घेतला. यानंतर यांच्या फोनवर संभाषण सुरु झाले. आरोपी तरुणीने पिडीतेला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर तिला ग्वाल्हेरला बोलावले.

आरोपीने तिच्यावर अत्याचार करत त्याची व्हिडिओ क्लीप बनवली. यानंतर पीडितेला समजले की आरोपी तरुणी खूप मोठे रॅकेट चावलत आहे. आरोपी तरुणी अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अशाच प्रकारचे अत्याचार करत असल्याचे लक्षात आले. मोठ्या मुश्किलीने पीडित तरुणीने आपल्या कुटूंबियांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. आरोपी तरुणी फेसबुकच्या माध्यमातून अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होती. तसेच त्यांच्यासोबत गैरकृत्य करुन त्याचे चित्रीकरण करत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here