जयपूर (राजस्थान) : बाडमेर जिल्ह्यात ४० वर्षीय महिलेने आपल्या २५ वर्षांच्या जावयासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होतं. यातूनच दोघांनी आत्महत्या केली. लंगेरा फाटाजवळ सोमवारी रात्री हा प्रकार घडला. सासू आणि जावयाने एकत्र गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. घरासमोरून जाणाऱ्या वाहन चालकाने खिडकीतून लटकलेला मृतदेह पाहिला होता. यानंतर गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. यादरम्यान गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
जावयाचं एक वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येमागील तपास सुरू केला आहे.