नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – अक्कलकुवा शहरातील शेवाळी- नेत्रंग महामार्गावरील वरखेडी नदीवरील
पुलाची मोठया प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर एक ते दिड फुटाचे खड्डे पडले आहेत त्यामुळे आज दिनांक 12 रोजी 11 वाजे दरम्यान पुलावर अवजड वाहन अडकल्याने महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहने रस्त्यावर अडकुन पडली.वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन जे सी बी आणुन अवजड वाहन हटविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन मोठे व अवजड असल्याने त्यास बाजूला करणे अवघड जात होते.
पुलावरील काँक्रीट रस्त्याच्या लोखंडी सळया बाहेर निघाल्याने वाहनांच्या टायरचे नुकसान होत आहे.रस्त्यावर एक ते दिड फुटाचे खड्डे पडल्यामुळे तेथुन वाहन सुरक्षित काढणे जिकरीचे झाले आहे.पायी चालणारे पादचारी व मोटर सायकल स्वार यांना तारेवरची कसरत करत जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.मात्र याकडे संबंधित महामार्ग विभागाने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे.महामार्गावरील या गंभीर समस्येकडे महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देऊन पुलावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी.गेल्या दोन महिन्यापुर्वीच पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली मात्र 4 दिवसात रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले.त्यानंतर रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर सळया बाहेर निघाल्याने दररोज किमान एका वाहनाचा तरी टायर फुटतो अथवा कित्येक वाहनांचे टायर पंक्चर होतात.एकंदरीत निगरगट्ट महा मार्ग विभागाला यात काही घेणे देणे वाटत नाही त्यामुळे वाहन धारक व पायी चालणाऱ्या पादचारींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार वरखेडी नदीवरील पुलावर अवजड वाहन अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा







