बद्रीनारायण काळे यांच्या कार्याला ज्ञानदीप एज्युकेशन सोसायटीचा सलाम

दोंडाईचा (संतोष कोळी) – कोरोना काळात अडचणींत आलेल्यांना मदत करण्यासाठीदेखील कोणी तयार नव्हते या प्रतिकुल काळात एखाद्याने मदतीचा हात दिला तर ज्यांना मदत मिळते ते मदत करणाऱ्याला परमेश्वराचा दर्जा देतात. अशीच निःस्वार्थ सेवा करणारे येथील बद्रीनारायणजी काळे यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवासभाडेही खर्च न करु शकणाऱ्या कोविड पेशंटला स्वतः कोविड सेंटरला पोहचवलेत. त्याकाळात कोविड पेशंट उपचारासाठी पोहचणे आवश्यक होते, न घाबरता योग्य ती काळजी घेऊन त्यांनी केलेल्या निर्भीड कार्याला सलाम म्हणून ज्ञानदीप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम, कैलास शर्मा, राजेंद्र अग्रवाल, मनीष बडाले तसेच काळे परिवाराच्या उपस्थितीत त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here