नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या गौरव व विद्यार्थ्यांच्या सत्कार

nuruddin-mullaji

कासोदा ता एरंडोल (प्रतिनिधी) : येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना मानद डॉक्टरेट उपाधी मिळाल्याबद्दल मौलाना आझाद विचार मंच त्रीशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य व मित्रपरिवार यांनी त्यांच्या सत्कार केला.




इंडियन मुस्लिम फ्रंट पुणे तर्फे महाराष्ट्र कार्यकारी सदस्य जुल्फिकार अली यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर गिनीज बुक मध्ये नोंद असलेले प्रख्यात छायाचित्रकार सुनील दाभाडे सर यांनी त्यांच्या रेखाटलेला छायाचित्र देऊन सन्मानित केले सरपंच महेश पांडे व ग्रामपंचायत सदस्य बाहेरून आलेले व गावातील मित्रपरिवारांनी त्यांचा सत्कार केला. कासोदा गावातील इयत्ता दहावी व बारावी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मान्यवराच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.




karim-salarकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी उपमहापौर मौलाना आझाद विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ, अब्दुल करीम सालार होते. याप्रसंगी सरपंच महेश पांडे प्रमोद पाटील चिलाणेकर भास्कर चौधरी प्रतीक जाधव शिवाजी अहिरराव सर एरंडोल डॉ मोहम्मद सादिक शेख भुसावळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉ नुरुद्दीन मुल्लाजी यांनी सत्काराला उत्तर दिले तर अब्दुल करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.



प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुजाहिद खान यांनी केले तर आभार अध्यक्ष आरिफ पेंटर यांनी मानले. याप्रसंगी अब्दुल हाफीज अब्दुल हक धुळे विजय सुपडू लुल्हे सर जळगाव सुनील दाभाडे सर जळगाव उपसरपंच अब्दुल अजीज सर व ग्रामपंचायत सदस्य बंटी बाबुलाल चौधरी मुश्रीफ पठाण अश्फाकली अबू फिरोज शेख आरिफ मण्यार एडवोकेट जयेश पिलोरे अमजद खान इस्माईल खान शहजादी उर्दू हायस्कूल चे चेअरमन जमीर अली गावातील व जिल्ह्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here