रा.काँ.च्या जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा – ममुराबाद गटप्रमुखपदी हेमंत पाटील

hemant-patil-asoda

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी एक बुथ टेन युथ प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगाव तालुका कार्यक्रमात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गट व गणातील विविध नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा – ममुराबाद गटप्रमुख म्हणून असोदा येथील ग्रामपंचायत सदस्य हेमंत धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

 

यावेळी बोलतांना गुलाबराव देवकर यांनी मतदारसंघात गोर-गरीबांचे कामे करु द्या,हॉस्पिटल कामे,विधवा महिलांचे कामे,अंपग व्यक्तीचे काम करण्याबाबत पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी गुलाबराव देवकर यांच्यासमवेत विधानसभा क्षेत्र जळगाव शहर प्रमुख लिलाधर तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जळगाव ग्रामीण पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, दिलीप चव्हाण, प्रा.राजूसर, योगराज सपकाळे, हेमंत पाटील. संजू पाटील. विलास सोनवणे, उमेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अशोक भिवा सोनवणे, युवक अध्यक्ष जळगाव विनायक चव्हाण, युवक उपाध्यक्ष जळगाव तालुका चेतन कोळी, धनराज पाटील सावखेडा खू।। आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here