नवजीवन प्लसतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढविणारे अनोखे गिफ्ट

navjeevanplus

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : देशात सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध माध्यमातून साजरा होत आहे. याचबरोबर शहरात आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवत खरेदीचे स्वातंत्र्य देणाऱ्या नवजीवन प्लस आणि ग्राहकांच्या ऋणानुबंधाच्या मॉडर्न ट्रेण्डचे ३० वे वर्ष या दोन्हींचे औचित्य साधून, नवजीवन प्लसने आपल्या ग्राहकांसाठी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढविणारे अनोखे गिफ्ट दिले आहे.

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नवजीवन प्लसमध्ये दि. ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान महाबचतीची बिग डेज ऑफर सुरु आहे. या ऑफरमध्ये महाबचतीच्या भरपूर योजना ग्राहकांसाठी देण्यात आल्या असून, १५०० रुपयांच्या खरेदीवर अर्धा किलो गिट्‌स रेडी गुलाबजाम मोफत देण्यात येणार आहे.

 

महाबचतीच्या योजनांसह अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचा गोडवा वाढविणाऱ्या या ऑफरचा नवजीवन प्लसच्या बहिणाबाई गार्डन चौक व महाबळ चौकातील स्टोअरला भेट देवून ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन नवजीवन प्लसतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here