जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : आज (दि.१६) जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये आयटीबीपीच्या ३९ जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत असतांना हा अपघात झाला असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात ४ जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून आतापर्यंत चार जवांनाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनवाडीवरुन पहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
अपघात झालेल्या बसमध्ये ३९ जवान होते. ज्यामध्ये आयटीबीपीचे ३७ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या २ जवानांचा समावेश होता. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती मिळत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात जखमींची संख्या वाढण्याची भीती आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं असून आतापर्यंत या अपघातत ४ जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.







