जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर झेंडा अभियान राबविण्याचे केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश असतांना, जळगाव येथील तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालय हे स्वतंत्र आस्थापना असतांनाही दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान या कार्यालयात ध्वजारोहण व झेंडावंदन झालेले नाही.
केंद्र व राज्य सरकारचे दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट राष्ट्रीय ध्वज तिरंगा लावण्याचे स्पष्ट निर्देश असतांना या आदेशाचे पालन न करण्याचे गांभीर्य तालुका वैद्यकिय अधिकारी संजय चव्हाण यांनी लक्षात घेतले नाही. या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या निवेदनावर आरपीआयचे युवक महानगर अध्यक्ष मिलींद सोनवणे यांच्यासह अक्षय मेघे, जितेंद्र सोनवणे, गणेश मोरे, योगेश अनवते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







