खुलताबाद (तालुका प्रतिनिधी भागीनाथ घुसळे) : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबाद अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव येथे तालुकास्तरीय वादिवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. श्रीमती बोकडे प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालय औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री भडके सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खुलताबाद तालुक्याचे पोलीस निरीक्षक भुजंगराव हातमोडे उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविका श्री खालापूरे सर यांनी केले ते म्हणाले की, वादिवाद स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी स्पर्धा असून या स्पर्धेचा विषय* विज्ञान शाप की वरदान* असा ठेवण्यात आला होता विद्यार्थ्यांनी या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचे आपले मत मांडले व विज्ञान शाप की वरदान कसे हे पटवून दिले यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडवून येतो व विद्यार्थ्यांना एक स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्याची जिद्द निर्माण होते व जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते तसेच आत्मविश्वास निर्माण होतो असे सांगितले .
मान्यवराच्या हस्ते, वादिवाद स्पर्धेचे प्रथम पारितोषक जिल्हा परिषद प्रशाला चिकलठाण येथील विद्यार्थिनी कुमारी गायत्री योगेश कंचार रोख रक्कम १००१ व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच द्वितीय क्रमांक समान गुणामुळे दोन जणांना देण्यात आला गुरुदेव समंतभद्रा विद्यामंदिर वेरूळ येथील गौरव गणेश काळे रोख रक्कम ५०१ व प्रमाणपत्र व जिल्हा परिषद प्रशाला चिकलठाणा येथील विद्यार्थिनी राधिका भगवान चव्हाण रोख रक्कम ५०१ व प्रमाणपत्र तसेच तृतीय पारितोषिक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव येथील विद्यार्थी सावन वसंत गिरे याला रोख रक्कम २५१ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या सर्व प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते बक्षीस व रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक भुजंगराव हातमोडे म्हणाले की, आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त गुण व कौशल्य असतात ते बाहेर येण्याची त्यांना संधी निर्माण करून द्यावी लागते शाळेचा स्टाफ मेहनती आहे व शाळा खूप स्वच्छ व सुंदर आहे यावेळी साहेबांनी आवर्जून शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे यांचे नाव घेतले व ते खुप खुप छान काम करत आहे आहेत याबद्दल मला अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
याप्रसंगी श्री भडके सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सांगितले की आपण सतत प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आपल्याला यश निश्चित प्राप्त होते ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आला नाही त्यांनी निराश न होता परत जोमाने तयार लागायचे व यश संपादन करायचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी सर्व आयोजन व संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे सर यांनी केले व त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना नवी दिशा स्पर्धेच्या युगात वाव मिळावा अशी सरांची इच्छा होती म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन नऊ ऑगस्ट व क्रांती दिनानिमित्त व आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित शाळेतील शिक्षक श्री वारे सर,श्री भावसार सर ,श्री केरेसर, शाळेचे अधीक्षक श्री कांबळे सर,राठोड सर, शिंदे सर, सोनवणे दादा, माळी ताई ,राठोड ताई ,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खेडकर मॅडम यांनी केले व सर्वात शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती सानप मॅडम यांनी केले.







