३८ व्या पोलीस क्रिडा स्पर्धेत पुणे आयुक्तालयाच्या मुख्यालय व इतर शाखा विजयी

pune-police-krida-spardha

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ३८ व्या पुणे पोलीस व पिंपरी-चिंवड आयुक्तालय यांच्यात झालेल्या पोलीस क्रिडा स्पर्धेची सर्वसाधारण विजेतीपदाची ढाल पुणे आयुक्तालयाच्या मुख्यालय व इतर शाखा यांनी पटकावली आहे.

 

शिवाजीनगर मुख्यालय येथे शुक्रवारी सायंकाळी पुणे आयकर विभागाचे प्रमुख मुख्य आयुक्त आय.आर.एस प्रविण कुमार यांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा झाला. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ.जालिंदर सुपेकर,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ विभाग, सहायक पोलीस आयुक्त व इतर पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये पुणे पोलीस,पुणे आयुक्तालयाच्या पुर्व-पश्चिम विभाग, मुख्य़ालय व इतर शाखा तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालय या चार संघातील २४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

 

या स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये महिला गटात पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या महिला पोलीस अंमलदार स्नेहा धुरी यांनी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा मान मिळवला.तर पुरुष गटात पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस अंमलदार अली शेख हे सर्वोत्कृष्ठ पुरुष खेळाडू ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here