पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) । गुढीपाडव्यानिमित्त कसबा पेठ येथील अग्निशमन दलातील जवानांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून येणारे नवीन वर्ष सुख , समृद्धीचे सुरक्षित आणि आरोग्य संपन्न जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने ” शूर आम्ही वंदितो “, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शाह यांचा संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला गायिका स्मिता जोशी यांनी शूर आम्ही वंदितो व श्री रामाचे भजन सादर केले, अग्निशामक दलातील जवानांनीही एकत्रित भजन गात भजनाला साथ दिली.
कसबा अग्निशामक केंद्रातील पंधरा जवान यांना लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषेत औक्षण करत, प्रत्येक जवानाला मायेने लाडू भरवत, मोदकाचा प्रसाद आणि गुढी देत त्यांना सन्मान करत मंडळातील कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने नवीन वर्षे जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत साजरे केले.
शाह यांनी प्रस्ताविकात शहरातील नागरिकांच्या वरती जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा या संकटातून स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांची रक्षा करणारे जवान आपले खरे हिरो आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सदर कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच चिमुकल्यांना या वयात कृतज्ञतेचा आणि आपल्या गुढी पाडवा सणाचा संस्कार समजावा या हेतूने अकरा मुली कसबा पेठ येथी अग्निशामक केंद्रावर उपस्थित होत्या .
कसबा पेठ अग्निशमन केंद्र सकाळ पाळी व दुपार पाळी मधील जवान व प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश रघुनाथ चौधरी तसेच सकाळ पाळी मधील प्रभारी तांडेल हरीश बुंदिले ड्रायव्हर वाघमारे, फायरमन अब्दुल पटेल, राजेंद्र महाडिक ,दुपार पाळी मधील ड्रायव्हर आकाश दुबळे , फायरमन संतोष अरगडे, सुरेश पवार, गणेश लोणारे व मंडळातील नरेंद्र व्यास, पियूष शाह, गंधाली शाह, उर्मिला मेहंदळे, अश्विनी पायगुडे, स्मिता शाह, आदिती म्हसवडे, गायिका स्मिता जोशी उपस्थित होते. कमलेश चौधरी यांनी आभार मानले.







