पिस्तुल व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद

accused-arrested-with-gavathi-pistol

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शस्त्र विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि २५) वाकड येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ऋषीकेश उर्फ मोन्या शामराव वाघोरे (रा. कस्पटे वस्ती वाकड) याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रितम वाघ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खबर मिळाली की, कस्पटेवस्ती येथे एकजण पिस्तूल बाळगून फिरत आहे.त्यानुसार सापळा रचून ऋषिकेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल व पिस्तुलच्या मॅगझीनमधून एक जिवंत काडतुस असा एकूण २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बी.आर.गोसावी, उपनिरीक्षक डी.के.दळवी,सहायक पोलीस फौजदार वाव्हळे,पोलीस हवालदार प्रीतम वाघ, गवारी, शेख,वडेकर,पोलीस कॉन्सटेबल आत्तार, शेळके, महिला पोलीस अंमलदार वैष्णवी गावडे, संगीता जाधव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here