यावल (प्रतिनिधी) : शहरात मोकाट गुरे मुक्तपणे संचार करीत असल्याने अनेक वेळा वाहनांचे अपघात झाल्याचे उदाहरणे आहेत गेल्या आठवड्यात येथील योगा योग पेठ मधील रहिवासी नथ्थु यशवंत पाटील (बारी) वय ५५ वर्षे यांना मोकाट गुराने जोरदार धडक मारल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. एका खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असतांना रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.
या संदर्भात शहरातील विविध संघटनानी नागरिकांनी मोकाट गुरांबाबत अनेक वेळा तक्रारी करून ही नगर परिषद दखल घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येथील बारी वाड्यातील नथ्थु यशवंत पाटील यांना बावीस ऑगस्ट रोजी मोकाट गुराने जोरदार धडक दिली असता ते खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असता त्यांचा मृत्यू झाला आहे.
मोकाट गुरे मालकांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी बारी यांच्या कुटुंबीयांकडून मागणी होत आहे. मयत पाटील यांचे पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगा असा परिवार आहे पाटील खाजगी कामगार म्हणून कार्यरत होते त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबातील आधार गेला असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.







