जळगाव (प्रतिनिधी) : सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या नवजीवन प्लसतर्फे आज (दि.१०) जागतिक गुलाबजाम दिवसानिमित्त गिट्स व सनफ्लॉवर वनस्पती यांच्यासोबत ग्राहकांना गुलाबजामचा आस्वाद देण्यात येणार असून, सोबत अभिप्राय स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
भारतीय पक्वानात गुलाबजामचे स्थान हे मोठे आहे. लग्नसराई असो वा घरातील अन्य शुभकार्य, खमंग पदार्थांची रेलचेल असलेल्या ताटात गुलाबजाम पडले नाहीत तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. आज (दि.१०) हा जागतिक गुलाबजाम दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना नवजीवन प्लस, गिट्स व सनफ्लॉवर वनस्पती यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन प्लसच्या बहिणाबाई गार्डन चौक स्टोअर येथे दुपारी ४ ते ८ च्या दरम्यान गुलाबजामचा आस्वाद घेता येणार आहे. यासोबतच ग्राहकांना गुलाबजामविषयी अभिप्राय नोंदवायचा असून, या अभिप्रायातील उत्कृष्ट अभिप्रायांना रु.२००० चे प्रथम तसेच रु.१०० चे गिफ्ट कुपनची १० पारितोषिके देण्यात येणार आहेत.
जागतिक गुलाबजाम दिनानिमित्त गुलाबजामचा आस्वाद घेऊन या अभिप्राय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नवजीवन प्लसतर्फे करण्यात आले आहे.







