मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोदवड येथील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच कमलाकर तायडे, शिवसेना शिंदे गट शाखाध्यक्ष लहू घुळे, उपसरपंच पवन कोंगळे यांनी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी एकनाथराव खडसे यांनी कमलाकर तायडे,लहू घुळे, पवन कोंगळे यांच्या गळ्यातराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. याप्रसंगी सरपंच कमलाकर तायडे म्हणाले गावात विकास कामे होतील या आशेने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत होतो परंतु तिन वर्षात भ्रमनिरास झाला याऊलट एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बोदवड गावात आतापर्यंत अनेक विकास कामे झाली. यापुढे सुद्धा एकनाथराव खडसे विकास कामांना निधी उपलब्ध करून देतील हा विश्वास आहे, असे जनसंवाद यात्रेदरम्यान बोदवड येथील शिंदे गटाचे इतर पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे कमलाकर तायडे यांनी सांगितले.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की, बोदवड येथे सभागृह, बुद्ध विहार रस्ते, पाणी पुरवठा यासारख्या मुलभूत सुविधांसाठी आतपर्यंत निधी उपलब्ध करून दिला बोदवड फाटा ते पूर्णा नदी पर्यंत रस्ता डांबरीकरण साठी निधी उपलब्ध करून दिला. भविष्यात सुद्धा राहिलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात स्वागत आहे
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हासरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती दशरथ कांडेलकर, प्रविण कांडेलकर,माजी सरपंच ज्ञानदेव मांडोकार,वामन पाटील, राष्ट्रवादी युवक शाखाध्यक्ष योगेशइंगळे, उपाध्यक्ष पंजाबराव पाटील, वसंत पाटील, विशाल रोटे, चेतन राजपुत, समाधान माळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.







