शहर व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन मिळण्याची महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाची मागणी

जळगाव (निलेश पाटील) – महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागातील धुळे व नंदुरबार जिल्हा, शहर व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक ग्रामीण रुग्णालये व जिल्हा उपजिल्हा रुग्णालये याठिकाणी कोरोना कोविड १९ च्या प्रादुर्भावात स्वतःचा जीव धोक्यात घालून जबाबदारीने काम करीत आहे. या सुरक्षारक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. हे सुरक्षा रक्षक वेतनावर अवलंबून असल्याने, त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पुरेशा पैश्यांअभावी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथील सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन तात्काळ देण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश निर्गमित करावे.
पत्रावर अध्यक्ष जळगाव व प्रभारी धुळे नंदुरबार जिल्हा मिलिंद दत्तात्रय वाणी, उपाध्यक्ष धोंडीराम प्रताप पगारे, सचिव जळगाव व प्रभारी धुळे नंदुरबार जिल्हा पंकज छगन सपकाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here