चोरीच्या आरोपावरून झालेल्या मारहाणीत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

deadbody
file photo

गाझियाबाद । चोरीच्या आरोपावरून एका २३ वर्षीय तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. एका घरात भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे त्यांना एका मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला मृत तरुणीच्या बहिणीने सांगितले की, तिच्या बहिणीला चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

 

गाझियाबादच्या सिद्धार्थ विहार भागात ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांना घरात भांडण झाल्याची माहिती मिळाली होती. तेथे मुलगी आल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिच्या येण्याच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनेच्या वेळी घटनास्थळी डीजे वाजत होता.

 

या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे एसीपी रवी प्रकाश यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे.गाझियाबाद पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here