मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचा कॅण्डलमार्च

aam-adami-parti

जळगाव (जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. विजय दाणेज) | मणिपूरमधील महिलेला विवस्त्र करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील आम आदमी पार्टीच्यावतीने केंद्र सरकार आणि मणिपूरमधील सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅण्डलमार्च काढण्यात आला होता.

aap-jalgaonदुपारी चार वाजता शिवाजी महाराज पुतळ्यापासून कॅण्डलमार्चला सुरुवात करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व राज्य संघटन सचिव नाविंदरसिंग आहलुवालिया यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार निकम, युवा महिला जिल्हाध्यक्षा अमृता नेतकर, मिलींद चौधरी, रईस कुरेशी, ॲड. विजय दाणेज, डॉ.सुनिल गाजरे, डॉ.नारायण अटकोरे, माधवराव जाधव, अनिल वाघ, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ.महेश पवार आदींची उपस्थिती होती.

हा मोर्चा नव्या बसस्थानक, गांधी उद्यान, स्वातंत्र्यचौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here