शिक्षा एवं संस्कृती संमेलनात सलील रत्नाकर पाटील सन्मानित

salil-patil

पुणे (सहसंपादक सलील पाटील) | दिल्ली येथे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. सलील रत्नाकर पाटील यांना विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कार्य केल्याबद्दल पद्मश्री डॉ. सुकामा आचार्य यांच्या हस्ते शिक्षा एवं संस्कृती संमेलनात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. रविंद्र भोळे उरळीकांचन, धन्यकुमार जैन चीफ एडिटर दैनिक जनशक्ती जळगाव, यांनाही स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शेला देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांमध्ये प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री बी एल वर्मा जी, पूर्व मंत्री राजर्षी ठाकूर विक्रम सिंहजी, राष्ट्रीय पार्टीचे अध्यक्ष अनुरागसिंह यादव जी, सनातन धर्माच्या गुरु मॅा पूजा जी, युवा प्रेरक तन्मय त्यागीजी गझियाबाद, निर्देशक रोविन्द्र कुमारजी-अध्यक्ष सर्वेश्वर महादेव ज्योतिर्लिंग धाम, वेद आचार्यजी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समर्पित भावनेने विविध संस्थानांमार्फत राज्यभर सामाजिक, धार्मिक, आश्रमसेवा, नैसर्गिक आपत्तीसमयी सेवा, वृक्षारोपण इत्यादी क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. निष्काम कार्य केल्याबद्दल त्यांना हा शिक्षा एवं संस्कृती संमेलनात वरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here