धन्यकुमार जैन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

dhanyakumar

पुणे (सहसंपादक सलील पाटील) | सुनपता – बिजनौर (उ.प्र.) येथील सर्वेश्वर महादेव ज्योतिर्लिंग धामतर्फे जळगाव येथील धन्यकुमार आनंदराव जैन यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पथिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

पद्मश्री डॉ. सुकामाजी आचार्य यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दिल्ली येथील लोधी इस्टेटमधील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये १७ जुलै रोजी आयोजित शिक्षा एवम संस्कृती संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील धन्यकुमार जैन यांचेसह तीन व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. रविंद्र भोळे उरळीकांचन, महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. सलील रत्नाकर पाटील यांनाही स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शेला देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांमध्ये प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री बी एल वर्मा जी, पूर्व मंत्री राजर्षी ठाकूर विक्रम सिंहजी, राष्ट्रीय पार्टीचे अध्यक्ष अनुरागसिंह यादव जी, सनातन धर्माच्या गुरु मॅा पूजा जी, युवा प्रेरक तन्मय त्यागीजी गझियाबाद, निर्देशक रोविन्द्र कुमारजी-अध्यक्ष सर्वेश्वर महादेव ज्योतिर्लिंग धाम, वेद आचार्यजी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here