जळगाव (संपादक सुनिल पाटील) : खलाणे ग्राम पंचायतचे माजी सरपंच तथा दक्ष पोलिस टाइम्सचे संस्थापक विजय टाटिया तसेच विकाससोसायटीचे चेअरमन खंडेराव भदाणे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांची भेट घेतली.
यावेळी गावविकास व समृध्दीविषयक विविध प्रश्नावर चर्चा करुन गावातील विकासकामांसाठी निधी देण्याची विनंती केली असता आमदार अमरीशभाई पटेल यांनी तातडीने महादेव मंदिराच्या दुरुस्तीसाठी दहा लाखाचा निधी मंजूर करून दिला.







