मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) | २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.
विवेक अग्नीहोत्री आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सिनेमाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, विवेक अग्नीहोत्री देखील सिनेमाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर असतात. आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
DATE ANNOUNCEMENT:
Dear friends, your film #TheVaccineWar #ATrueStory will release worldwide on the auspicious day of 28th September 2023.
Please bless us. pic.twitter.com/qThKxTjPiw— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 15, 2023
निर्मात्याने मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधत सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. जेव्हा जगभरात कोविड-१९ मुळे हाहाकार माजला होता, तेव्हा अनेकांना कोरानाची लागण झाली होती. तर अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. कोरोनावर मात करण्यासाठी देशात एक लस तयार करण्यात आली होती.
कोरोना काळात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. सत्य घडलेली घटना मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न विवेक अग्नीहोत्री यांनी केला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ पहिला सिनेमा आहे, ज्यामध्ये भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे कोव्हॅक्सिन बनवण्याचा प्रवास दाखण्यात येणार आहे.
सिनेमात अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. खुद्द विवेक अग्नीहोत्री यांनी ट्वीटरवर सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. चाहते देखील टीझरवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. टीझर प्रदर्शित करत विवेक अग्नीहोत्री यांनी सिनेमा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. म्हणजे बॉक्स ऑफिस पुन्हा दोन सिनेमांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. २८ सप्टेंबर रोजी अभिनेता प्रभास स्टारर ‘सालार’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.







