कांदिवली पोलिसांनी २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूसांसह केले दोघांना जेरबंद

kandivali-police

मुंबई (प्रतिनिधी) | कांदिवली पश्चिम गुन्हे अन्वेषण कक्षाला मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूसांसह केले दोघांना जेरबंद करण्यात आले आहे.

 

राजीव गांधी उद्यानाजवळ सुलभ शौचालयासमोर निलेश व अमूल हे दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तात्काळ वपोनि विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ११ चे पथकाने घटनास्थळी जावून दोघांना ताब्यात घेतले. पंचांसमोर त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे कमरेला खोचलेले २ देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसे आढळून आली. सदर अग्निशस्त्रे व दारुगोळा बाळगणेबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. ही शस्त्रे धुळे येथून आणल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

 

दोन्ही आरोपीविरुध्द कांदिवली पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ५५१/२०२३ कलम ३, २५, हत्यार कायदा सहकलम ३७ (१) (अ) सह कलम १३५ मपोका प्रमाणे दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कक्ष ११ गुन्हे शाखा कांदिवली पश्चिम करत आहे.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त गुन्हे लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त काशी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या निर्देशांनुसार पोनि घोणे, सपोनि जाधव, सपोनि विशाल पाटील, सफौ कांबळे, पोह रावराणे, पोह खताते, पोह खांडेकर, पोशि देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here