अडावद परिसरात १३ तलवारीसह ५ जण जेरबंद

crime
file photo

चोपडा (प्रतिनिधी) | तालुक्यातील अडावद परिसरात हत्यार बाळगणाऱ्यांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी मोहीम राबविली असून, तब्बल आहे. १३ तलवारी जप्त केल्या आहे. याप्रकरणी ५ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे.

 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राबविलेल्या शोध मोहिमे दरम्यान अडावद, लोणी, सुटकार येथील पाचजणांकडून १३ हजार रुपये किमतीच्या ११ तलवारी व दोन गुप्त्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात सागर भगवान महाजन (२२, अडावद), राहुल लक्ष्मण ठाकरे (१९, सुटकार), राज प्रमोद ठाकूर (२१ लोणी), चिरंजीव रवींद्र भोई (१९, अडावद ), मयूर रामेश्वर कोळी (२०, अडावद ) यांच्याविरुद्ध अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर कारवाई सहायक पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा, पोलिस उपनिरीक्षक जगदीश कोळंबे, चंद्रकांत पाटील, सहा. फौजदार शरीफ शेख, मुकेश तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, सुनील तायडे, नासिर तडवी, विनोद धनगर, फिरोज तडवी, किरण शिरसाठ, सतीश भोई, प्रदीप पाटील, शुभम बाविस्कर, संदीप पाटील, शैलेश माळी, रमिज सैय्यद यांनी ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here