पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : भारताचा स्वातंत्र्यदिन व कालकथित भारतजी गायकवाड यांच्या सन्मानार्थ युनायटेड संबोधी ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या वतीने धायरी येथे मतिमंद निवासी विद्यालयात गणवेश वाटप व अन्नदान करण्यात आले.
याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुहास गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, विक्रम कसबे, रत्नाकर दांहिजे, ओमकार भोसले, सचिन गायकवाड, तुषार गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड आदी उपस्थित होते.









