गोयगाव जि.प.शाळेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण व विविध स्पर्धा संपन्न

goygaon

संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळा ध्वजारोहण व विविध स्पर्धांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माळसकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष व तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक व तसेच समस्त गावकरी यांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा व खेळणी लांब उडी लिंबू चमचा १०० मीटर धावणे घेण्यात आल्या. स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देवून कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here