पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा सिंहगड पोलिसांच्या ताब्यात

pistol
File Photo

पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : बेकायदेशीररित्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍याला सिंहगड रोडवरील दळवीवाडा फाटा येथील डी.के. बिर्याणीजवळून सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड पोलिस हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे आणि अमोल पाटील यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल आणि जिवंत काडतुसे असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन सागर महादेव चौधरी (३०, रा. स्वरसारा कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. ४०३, नर्‍हे इंडस्ट्रीज, नर्‍हे, पुणे) याला दळवीवाडा फाटा येथील डी.के. बिर्याणीजवळून ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रूपये किंमतीचे एक गावठी पिस्टल आणि १ हजार रूपये किंमतीची २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त सहुश शर्मा, सहाय्यक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहाय्यक उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलिस अंमलदार संजय शिंदे, अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर आणि अविनाश कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here