पिंपरीत २९ किलो गांजा जप्त; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

crime
File Photo

पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत काळेवाडी भागामध्ये 29 किलो वजनाचा दोन लाख अठरा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमाराची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिका-यांना काळेवाडी ते केफएसी चौक, डी. पी रोड सेन्ट अॅल्फॉन्सो स्कूल शेजारील किशोर रामचंद्र पंजाबी यांचे मालकीच्या रुममध्ये तपासणी केली.

 

एनडीपीएस कायदा अंतर्गत हिरव्या रंगाची अर्धवट वाळलेले गांजाची पान व फुले व बोंडे असलेला एकुण २९.८२१ किलो वजनाचा २ लाख १८, हजार २१० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त मुद्देमालाजवळ कोणीही संशयित व्यक्ती मिळून आला नाही म्हणुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here