रेल्वे चालकाला मोबाईलचा नाद नडला, रेल्वे रुळांवरुन ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली

mathura-train-accident

लखनौ (उपसंपादक सैय्यद गुलाम हुसेन) : मथुरा येथे काही दिवसांपूर्वी रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वे दुर्घटनेच्या संयुक्त तपास अहवालात चालक रेल्वे चालवताना मोबाईल फोनवर काहीतरी पाहत असल्याचं समोर आले आहे.

https://www.instagram.com/reel/CxurDStNLn1/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

चालकाच्या चुकीमुळे ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली होती, असं सूत्रांनी सांगितले. ही चूक ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टिम’च्या माध्यमातून उघड झाली. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सर्व प्रवाशी खाली उतरले. यानंतर रेल्वे कर्मचारी सचिन त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत असताना ट्रेनच्या इंजिनमध्ये पोहोचला. त्याने आपली बॅग इंजिनच्यामध्ये डेस्कवर ठेवली आणि त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागला. बॅगेच्या दाबामुळे एक्सलेटर पुढे सरकले आणि ट्रेन पुढे जाऊ लागली अन् ही दुर्घटना घडली. असे त्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आधीच उतरले होते. रात्री १०.५५च्या सुमारास लोको पायलट इंजिन बंद करून ते पार्क करत असताना हा अपघात झाला. प्लॅटफॉर्मवर रेल्वे इंजिनच्या प्रवेशापासून काही अंतरावर ओएचई लाईनचा पोल लावण्यात आला होता, त्यामुळे ट्रेनचे इंजिन त्यावर आदळले आणि थांबले. त्यामुळे अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here