चाळीसगाव येथील भारत वायररोप कंपनीच्या बंद गोडाऊनमध्ये चोरी करणारे आरोपी जेरबंद

चाळीसगाव पोलीस

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी तन्वीर शेख) : चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडून सन 2024 हे ” चाळीसगाव शहर सुरक्षित शहर ” या संकल्पनेखाली काम सुरु करण्याचे पोलीस स्टेशन कडून सन 2024 हेचे आधारे चाळीसगावचे नागरिकांमध्ये सुरक्षेकामी जनजागृती करण्यात येत आहे असून, सदर संकलानेचे गाव शहर पोलीसाकडून मोक्याच्या ठिकाणी बँका, सराफ बाजार, मुख्य मार्केट, चस रटैन्ड, रेल्वे स्टेशन परिसरात गस्त करुन संशयीत इसमावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच नागरिकांना स्टैन्ड रेल्वे स्टेशन.सी.टी.व्हि. कॅमेरे घराचे बाजुला आणि परिसरात लावणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यात सुध्दा नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

चाळीसगांव शहरात रात्रौ रिक्षा चालकांना कोणी संशयीत इसम प्रवासी म्हणून घेवून जात असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देणे कामी प्रोत्साहन देण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील दर्गावर नियमीत साधेवेशात वॉच ठेवून गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची नव्याने रचना करण्यात आली असुन सदर पथकास मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सौ. पोलीस अधिक्षक यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली चोरीच्या गुन्हयांना आळा घालणे कामी तसेच दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकामी सुचना देण्यात आलेल्या आहेत. तक्रारदार नामे प्रिन्सकुमार श्रीरामनरेश गुप्ता रा. सेक्टर नं.०४, MIDC चाळीसगांव यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. ७४/२०२४ भादवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीच्या गोडाऊन मधुन कोणतरी अज्ञात चोरट्यांनी ४५,०००/- रुपये किमतीचे इलेक्ट्रीक वायचे ०५ बंडल व ७५०/- रुपये किमतीचे पीपीकोर वायरचे ०१ चंडल असा एकुण ४५,७५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत तक्रार दिली आहे. सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ / २६५ योगेश वेलदार यांना तपासादरम्यान माहीती प्राप्त झाली कि, आरोपी नामे १) संजय शिवाजी कुन्हाडे वय २० वर्षे रा. आनंदवाडी, चाळीसगांव ह.मु. कृष्णापुरी, पाचोरा, २) सोमनाथ महादु गायकवाड वय ३४ वर्षे रा. कृष्णापुरी, पाचोरा ता. पाचोरा व ३) सागर बापू जाधव वय २० वर्षे रा. जुवार्डी ता. भडगांव यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे.चाळीसगांव शहर पो.स्टे. कडील पोहेकॉ योगेश बेलदार, राहुल सोनवणे, पोना / भुषण पाटील, दिपक पाटील, पोकॉ/ निलेश पाटील, अमोल भोसले, आशितोष सोनवणे, रविंद्र बच्छे या पथकाने सदर आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदर आरोपीतांचा मा. कोर्टाकडुन पोलीस कस्टडी घेवुन त्यांच्याकडुन चोरीस गेलेला ४५,०००/- रुपये किमतीचे इलेक्ट्रीक वायचे ०५ बंडल व ७५०/- रुपये किमतीचे पीपीकोर वायरचे ०१ चंडल असा एकुण ४५,७५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीतांच्या पोलीस कस्टडी दरम्यान इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा कसोशिने प्रयत्न करीत आहोत.तरी नागरीकांना चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येत आहे की, कोणी संशयीत इसम चाळीसगांव शहरात फिरत असल्यास त्यांची माहीती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणे करून चोरीच्या गुन्ह्यांना पायचंद घालणेकामी पोलीसांना मदत होईल आणि आपले चाळीसगांव शहर हे सुरक्षीत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here