भंडाऱ्याच्या जेवणानंतर ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

food poision

पारोळा (क्राइम रिपोर्टर डॉ.दिपक पाटील) : शाळेत आयोजित भंडाऱ्याच्या कार्यक्रमानंतर तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्वांवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. शिवरे दिगर ता. पारोळा येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.

शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी दुपारी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास भोजन करून विद्यार्थी घरी परतले. यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ व उलटी होऊ लागली. त्यामुळे एक नाही तर अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास होऊ लागला.

त्यामुळे पालकांनी या मुलांना लागलीच पारोळा येथे आणले. एक- एक करुन जवळपास ७० विद्यार्थ्यांवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांनी उपचार सुरु केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here