अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड; कोथरूडमधील घटना

kothrud

पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : कोथरूड भागातील राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीच्या सहाय्याने वाहन्नाची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. यात दोन रिक्षा, कार, टेम्पो अन्य चारचाकी वाहनांचा समावेश आहे.


या घटनेत वाहनांचे मालक चालक यांचे मोठया् प्रमाणात नुकसान झाले आहे. रिक्षा चालक, टेम्पो चालक, हे दिवसभर गाडी चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या वाहनांना अशा पद्धतीने तोडफोड केल्याने वाहन चालक मालक हळहळ व्यक्त करत आहेत. या घटना बाबतीत किश्किन्धानगर पोलिसांत नुकसान झालेल्या वाहनाचे मालक यांनी तक्रार केली आहे.


जिजाऊनगर, सुतारदरा भागात नेहमीच अश्या प्रकारच्या घटना या भागात घडत आहेत. या बाबीची पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते यांनी पुढाकार घेऊन या भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे. अशी मागणी परिसरातील सजग नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here